युब्रिथ एअर प्युरिफायरने शार्क टँकमध्ये 1.5 कोटी रुपये जिंकले; शार्क नमिता थापारने केली गुंतवणूक

शार्क टॅंक इंडियाचा दुसऱ्या सीझनमध्ये शार्क्सने चांगली गुंतवणूक केली आहे. युब्रिथ एअर प्युरिफायर या स्टार्टअप मध्ये पुण्याच्या उद्योजिका नमिता थापर यांनी १.५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

0

 

फेब्रुवारी महिना हा संजय मौर्य आणि शुभम सिंग यांच्यासाठी चांगला ठरला. त्यांच्या स्टार्टअप सोबत त्यांनी शार्क टॅंक इंडियात सहभाग घेतला होता. या ठिकाणी भारतीय उद्योजक व्यवसायाची माहिती देतात आणि त्याबदल्यात गुंतवणूक मिळवतात. 

संजय हे गुरुग्राम येथील बायोटेकनॉलॉजीशी संदर्भातील युब्रिथ स्टार्टअपचे संस्थापक आहेत. शुभम हे या स्टार्टअपच्या प्रोडक्ट आणि नावीन्य विभागाचे प्रमुख आहेत. त्यांचे वय अनुक्रमे २८ आणि ३० असून त्यांनी ४५ व ५० च्या दरम्यान असल्याचे कार्यक्रमाच्या वेळी सांगितले होते. यामध्ये सर्वसाधारणपणे उच्च वायू प्रदूषण पातळी आपल्या फुप्फुसांना किती वेगाने त्रास देते याचाच संदर्भ देण्यात आला होता. 

शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स तयार केला आहे. यामध्ये वायू प्रदूषणामुळे दिल्लीत जवळपास १० वर्षांनी आयुष्य कमी होऊ शकते असे सांगितले आहे. ही समस्या वाढतच चालली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मधील लोकांचे आयुष्य अडीच ते तीन वर्षांनी कमी होत आहे. संजय आणि शुभम यांनी तयार केलेले एअर प्युरिफायर फक्त घरातलीच हवा स्वच्छ करत नाही तर पर्यावरणाच्या नकारात्मक परिणामाला कमी करण्याचा प्रयत्न करते. 

या समस्येवर उपाय शोधताना वनस्पतीवर आधारित एअर प्युरिफायर तयार करण्यात आले. युब्रिथ मिनी आणि युब्रिथ लाईफ या घरात आणि कार्यालयात वापर केला जातो. तसेच युब्रिथ वॉल आणि युब्रिथ ३६० चा वापर मेट्रो स्टेशन, विमानतळ आणि शॉपिंग मॉलच्या ठिकाणी केला जातो. 

त्यांनी याबाबत दावा केला आहे की, युब्रिथचे एअर प्युरिफायर हे आधुनिक तंत्रज्ञानासह वनस्पतीच्या मदतीने नैसर्गिक हवा शुद्ध करते. याचे डिझाईन असे करण्यात आले आहे की, निसर्गातील हवा स्वच्छ होताना वनस्पतीच्या नैसर्गिक प्रक्रियेला चालना दिली जाते. 

संजय आणि शुभमने संशोधित केलेली प्युरिफायर टेकनॉलॉजीची चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. हे National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या दिल्लीच्या प्राध्यपकांनी त्याची तपासणी केली आहे. 

युब्रिथचे उत्पादन शार्क टॅंक मध्ये पोहचल्यानंतर उद्योजिका नमिता थापर यांनी १.५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीनंतर संस्थापकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. संजय म्हणतात की, “नमिता थापर यांच्यासोबत काम करण्यास कंपनी इच्छुक आहे. यामुळे युब्रिथचे ग्राहक जगभरात वाढण्यास नक्कीच मदत मिळेल. नमिता यांना फार्मा क्षेत्रातील अनुभव असल्यामुळे त्यांची युब्रिथचे उत्पादन अपडेट केले जाईल.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, काही दिवसांपासून कंपनीने १००० ग्राहकांच्या आयुष्यात बदल घडवून आणला आहे. हा प्रकल्प अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खाजगी आणि सरकारी शाळांमार्फत विविध प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. 

 

टेकनॉलॉजीची उभारणी 

२०१८ मध्ये युब्रिथ कंपनीची स्थापना करण्यात आली होती. संजय, अखिल गुप्ता, अक्षय गोयल आणि इंद्रजित राव यांनी सोबत स्थापना केली. इंजिनिअरिंग मॅनेजमेंटचे विद्यार्थी असणाऱ्यांनी विविध ठिकाणी नामांकित कॉलेजमधून शिक्षण घेतले होते. त्यानंतर सर्वजण एकत्र येऊन या स्टार्टअपची सुरुवात करण्यात आली. 

भारतातील जागतिक दर्जाचे ग्राहक उत्पादन बनवण्यासाठी हे सर्वजण एकत्र आले होते. पर्यावरणपूरक आणि शाश्वत वायू प्रदूषणाचा यामार्फत सामना केला जावा असा सर्वांचा विचार होता. या संशोधनाला आयआयटी रोपर, आयआयएम अहमदाबाद, इलेकट्रोनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि बायोटेकनॉलॉजी इंडस्ट्री संशोधन सहाय्यक कौन्सिलने पाठींबा दिला होता. कंपनीचे युरोप आणि भारतात एकूण ६ प्लांट आहेत. 

संजय, अखिल आणि इंद्रजित हे दशकापासून एकत्र काम करत आहेत. युब्रिथ तयार व्हायच्या आधी ते बंगळूर मधील स्टार्टअप मध्ये एकत्र काम करत होते. २०१८ मध्ये सामाजिक पातळीवर बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी एकत्र काम करायला सुरुवात केली. 

ते सर्वजण अक्षय सोबत एकत्र आले आणि भारताच्या वाढत्या वायू प्रदूषणाच्या समस्येसाठी निसर्गाला उपयोगी असणारे तंत्रज्ञान शोधायला सुरुवात केली. या पर्यायातून उत्तम व्यावसायिक बनण्यासोबतच लोकांच्या दीर्घकालीन आयुष्यात बदल कसा घडवून आणता येईल यासाठी प्रयत्न केला गेला. 

 

युब्रिथचा उद्देश आणि शार्क टँकचा अनुभव 

सध्या उपलब्ध असलेले हवेचे फिल्टर हे फक्त धुळीचे प्रदूषण फिल्टर करतात आणि ते महाग व पर्यावरणासाठी घातक पण आहेत. त्याच वेळी हे फिल्टर बायो डिग्रेड करणे खूपच अवघड असते. युब्रिथची सुरुवात करतानाच आम्ही दोन ध्येय डोळ्यासमोर ठेवली होती. पहिले हवेतील सर्व दूषित घटक पकडणारे हवेचे प्युरिफायर तयार करणे आणि दुसरे यांत्रिक हवेच्या प्युरिफायरला निसर्गाला उपयुक्त असणारे प्युरिफायर तयार करणे. 

युब्रिथची सुरुवात करताना केवळ नवीन कल्पनाच वाढत्या वायू प्रदूषणाच्या समस्या कमी करू शकतात हा विश्वास वाटत होता. पण शहरात दुसऱ्याच हवेच्या प्युरिफायरचा वापर केला जात आहे. त्यानंतर आम्ही एक उत्पादन बनवण्याचा निर्णय घेतला, त्यामध्ये वायू प्रदूषणाची समस्या शाश्वत पद्धतीने सांभाळली जाते असे संजय यांनी म्हटले होते. 

तंत्रज्ञान, डिझाईन आणि निसर्ग या तीन महत्वाच्या घटकांना एकत्रित करून टीम युब्रिथने सुरुवात केली. शार्क टॅंक इंडियाच्या अनुभवाबद्दल त्यांनी मत व्यक्त केले आहे. ते म्हणतात की, या २ ऱ्या सीझनमध्ये सहभाग घेतल्याचा अनुभव चांगला होता. 

कंपनीने शार्क टँक व्यतिरिक्त दुसरी कुठूनही गुंतवणूक घेतलेली नाही. या स्टार्टअपने आतापर्यंत १.६ कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा केला आहे. हा स्टार्टअप निसर्गाला हितकारक असून ग्राहकांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणेल. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.