आरसीबी आयपीएल कधीच जिंकली नाही, तरी संघाचे मूल्य १.०४ बिलिअन डॉलर

आयपीएलमधील संघ प्रामुख्याने तिकीट, स्पॉन्सरशिप, प्राईज मनी, मीडिया राईट्स आणि ब्रँड व्हॅल्यू या मार्गांनी पैसे कमवतात. पहिल्या तीन मार्गानी लिमिट असले तर मीडिया राईट्स आणि ब्रँड व्हॅल्यूमुळे संघाला जास्त पैसे कमवता येतात.

0

 

२०१६ वर्ष 

२०१६ या वर्षी हा संघ आयपीएलच्या अंतिम सामन्यात हा संघ पोहचला होता. आरसीबी हा संघ ११ वेळा प्ले ऑफ मध्ये पोहचला आहे. पण त्यांनी आयपीएलची ट्रॉफी एकदाही जिंकलेली नाही. तशी फ्रेंचायजीच्या दृष्टीने ही नकारात्मक गोष्ट आहे. 

हेच आपण आरसीबीच्या चाहत्यांना सांगितले तर ते या गोष्टीला खोटे ठरवतील. 

आरसीबीच्या चाहत्यांना संघ का आवडतो? 

 

१. सर्वात प्रथम ‘लोकल’ आवडते –

  • बंगळूर हे क्रिकेट क्लबचे शहर आहे. येथील चाहत्यांना स्थानिक क्लब आवडतात आणि त्यांच्यासाठी ‘आरसीबी’ हा क्लबच आहे.
  •  फ़ुटबॉल एफसी क्लब आरसीबी इतकाच ग्राहकांना प्रचंड आवडतो. आरसीबी क्लबचा जगातील टॉपच्या ५ क्लबमध्ये समावेश होतो.
  • ‘आरसीबी कॅफे; नावाने प्रेक्षकांसाठी कॅफे बंगळूर शहरात उघडण्यात आला आहे. येथे फक्त संघाला चिअरअप करण्यासाठी प्रेक्षक जमा होतात. जगभरात असे कॅफे चालू करण्याचा टीमचा मानस आहे. 

 

२. चाहते संघावर पैसे खर्च करतात – 

  • बंगळूर मधील क्रिकेट चाहते क्लब क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतात. बंगळूरच्या सामन्यांची तिकिटे मिळणे कठीण असते. 
  • कधीकधी तिकिटापेक्षा ३ पट जास्त किमतीने तिकिटांची विक्री केली जाते. आरसीबीचे प्रेक्षक संघाच्या प्रॅक्टिस सेशनसाठी तिकीट काढून स्टेडियमवर हजर राहतात.
  • ‘आरसीबी अनबॉक्सिंग’ कार्यक्रमाला प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. यावेळी खेळाडूंची होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. हसल बाय आरसीबी हे फिटनेस ॲप, आरसीबी कॉकटेल्स आणि मेटाव्हर्स संघाच्या व्यवसायाचाच भाग आहे. 

 

३. विराट कोहली हा आरसीबीचा मोठा ब्रँड –

  • आरसीबी क्लबसाठी विराट कोहली संघात असणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कोहलीने संघाचे नेतृत्व न केल्यामुळे त्याच्या ब्रँड किंमतीवर याचा कोणताही परिणाम झाला नाही.
  •  ए बी डिव्हिलीयर्स, ख्रिस गेल आणि फाप डुप्लेसिस या खेळाडूंच्या समावेशाने संघात ब्रँड व्हॅल्यू तयार होते. 
  • पुमा सोबत संघाची असलेली पार्टनरशिप पैसे कमवून देते. २०२१ साली पुमा कंपनीने आरसीबीच्या १ लाख जर्सीची विक्री केली होती. 

 

४. मनोरंजन हे खेळाचे नाव –

  • आरसीबीच्या सामन्याला जाण्याच्या आधी  संघाचे सोशल मीडिया अकाउंट एकदा तपासून पहा. आरसीबी संघाचे खेळाडू अनेक ब्रँडसोबत सहयोग करतात. विराट कोहली पुमाचा ब्रँड अँबेसेडर आहे. 
  • अनेक स्टार्टअप वार्षिक मार्केटिंग कॅलेंडर बनवत असतात, यापेक्षा आरसीबीचा व्यवसाय बेस्ट आहे. 
  • मनोरंजन क्षेत्रात खेळापेक्षा संघाने चांगली प्रगती केली आहे. आरसीबी संघाच्या पॉडकास्ट, बिहाइंड द सिन व्हिडीओ आणि पत्रकार परिषदेतून संघ पैसे कमवतो. 

 

५. सगळा चाहत्यांच्या लोकसंख्येचा खेळ –

  • आपल्या शेजारचे राज्य आंध्र प्रदेशाकडे आयपीएलमध्ये संघ नाही. त्याचा फायदा आरसीबीला मिळतो. 
  • त्यामुळे चाहते आरसीबीकडे आकर्षित होतात. चाहते संघाच्या सराव सामन्याला हजेरी लावतात. आरसीबीचे चाहते सर्वात मोठा व्यवसाय संघाला मिळवून देतात. 
Leave A Reply

Your email address will not be published.