टाटांच्या घराबाहेर जोडप १२ तास ताटकाळल, मग थेट टाटांनीच केला फोन 

काही दिवसांपूर्वी रतन टाटा एका मराठमोळ्या जोडप्याला भेटले होते. बराच वेळ रतन टाटांची वाट पाहिल्यानंतर या जोडप्याला टाटांनीच कॉल करून भेटीचे आमंत्रण दिले होते.

0

काही दिवसांपुर्वी अदिती भोसले वाळुंज यांनी रतन टाटांचा कॉल आल्याची कहाणी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यांनी लिंक्डइनच्या एका पोस्टद्वारे संपूर्ण गोष्ट सांगितली. त्यांनी रतन टाटांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्राच्या उत्तरात अदिती याना रतन टाटांचा कॉल आला होता.

पुण्यातील मोबाइल एनर्जी डिस्ट्रीब्यूशन स्टार्टअप रेपोस एनर्जीचे रतन टाटा यांच्या एका फोनने नशीब पालटले. पुण्यातील स्टर्टअप कंपनी रेपोस एनर्जीचे फाऊंडर आदिती भोसले वाळुंज आणि चेतन वाळुंज पुण्यातील आदिती भोसले वाळुंज आणि चेतन वाळुंज यांनी रेपोस एनर्जी नावाचा स्टार्टअप सुरू केला होता.

आदिती भोसले-वाळुंज आणि चेतन वाळुंज हे दोघेही इंधन पुरवठा करणारी स्टार्टअप कंपनी ‘रेपोस एनर्जी’चे संस्थापक आहेत. मात्र त्यांना त्यांचे आदर्श असलेल्या रतन टाटांकडून मार्गदर्शन हव होत. आपल्या कंपनीची भरभराट व्हावी यासाठी रतन टाटांकडून काही मार्गदर्शन मिळाल्यास बरं होईल अस या दोघांच मत होतं.

https://www.linkedin.com/posts/aditi-bhosale-walunj-118980228_our-encounter-with-ratan-tata-sir-was-not-activity-6961313983727308800-MFw5?utm_source=share&utm_medium=member_android

पुण्यातील हा स्टार्टअप उद्योगपती रतन टाटा यांच्या कंपनीच्या गुंतवणुकीतून सुरू झाला आहे. मात्र त्यांच्या आणि रतन टाटांच्या भेटीचा एक रंजक किस्सा आहे. तोच किस्सा अदिती यांनी शेअर केला आहे.रतन टाटांना भेटणं सोप नव्हत. तसच स्वत:च्या स्टार्टअपसाठी ते मेंटॉर व्हावेत अशी इच्छा असली तरी तेही इतकं सोप नव्हत. पण दोघांनीची प्रयत्न सोडले नाहीत. रतन टाटांना भेटण्यासाठी ते सतत प्रयत्नशील होते.

एकदा ३डी प्रेझेंटेशन घेऊन अदिती आणि चेतन रतन टाटांच्या घरी पोहोचले. त्यांनी एक पत्र आत पाठवलं आणि ते १२ तास वाट पाहत उभे होते. पण इतका वेळ वाट पाहूनही त्यांना रतन टाटांना भेटता आल नाही. आणि ते पुन्हा हॉटेलवर पोहोचले. थोड्यावेळाने दोघं हॉटेलवर पोहोचल्यानंतर अचानक त्यांचा फोन वाजला आणि मी रतन टाटा बोलत आहे…आपण भेटू शकतो का? असा आवाज आला.

हे एखाद्या स्वप्नासारख होत अस अदिती यांनी म्हटल. दुसऱ्या दिवशी अदिती आणि चेतन यांनी रतन टाटांसोबत तीन तास मीटिंग केली आणि त्यांनी प्रेझेन्टेशन दिलं. या दोघांच्या कंपनीमध्ये रतन टाटांनी एकदा नाही दोनदा गुंतवणूक केली. रेपोस ही सध्या भारतामधील 188 शहरांमध्ये सेवा देते. आता त्यांचे 1000 हून अधिक बिझनेस पार्टनर आहेत. मे 2022 मध्ये कंपनीला टाटा ग्रुपकडून 56 कोटींचा निधी मिळाला.

 

अदिती यांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाईल फ्युएल स्टेशन्सची सुविधा त्यांची कंपनी देते. हे एखाद्या एटीएमप्रमाणेच आहे. ही कंपनी घरपोच इंधन पुरवते. इंधनाची चोरी आणि इंधनाच्या वापरावर ही कंपनी नजर ठेवते. या कंपनीचे एकूण 2000 मोबाईल फ्युएल स्टेशन्स कार्यरत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.