शार्क टॅंक इंडिया; मामाअर्थ कंपनीच्या गझल अलग यांचा शार्क बनण्यापर्यंतचा प्रवास
शार्क टॅंक इंडियामध्ये मामाअर्थ कंपनीच्या गझल अलघ सहभागी झालेल्या आहेत. मामाअर्थ कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात येणार आहे.
शार्क टॅंक इंडियाच्या पहिल्या भागात मामाअर्थ कंपनीच्या संस्थापिका गझल अलग सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी गझल यांनी ७ कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. २०१६ ला कंपनीची सुरुवात केल्यापासून २०२३ मध्ये आयपीओ आणण्यापर्यंत मामाअर्थ कंपनीची वाटचाल कशी राहिली ते समजून घेऊयात. कंपनीची सुरुवात करण्याच्या आधी गझल अलग यांच्या आयुष्यात एक घटना घडली होती, त्यामुळे त्यांचे आयुष्यच बदलून गेले. गझल यांना अगस्त्य नावाचा मुलगा झाला. त्याच्या आरोग्याच्या देखभालीसाठी त्या बाहेरच्या देशातील प्रोडक्ट वापरत होत्या.
पण त्याच प्रकारचे आणि कंटेन्टचे उत्पादने भारतात उपलब्ध नव्हते. ही समस्या गझल यांच्या लक्षात आली. त्यांनी हीच गरज ओळखून व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी टॉक्सिन मुक्त सौंदर्यप्रसादने बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी फक्त बाळाच्या आरोग्यासाठी उपयोगी ६ प्रोडक्ट बनवण्यावरच लक्ष केंद्रित केले. गजल अलग यांनी मामाअर्थ कंपनीचे प्रोडक्ट बनवून झाल्यानंतर ते वापरण्यासाठी मित्र आणि नातेवाईकांमध्ये दिले. त्यावर त्यांना काय अनुभव आले त्यानुसार प्रोडक्ट मध्ये बदल करत गेले. अमेरिकेची कंपनी मेड सेफ कंपनीसोबत मामाअर्थ कंपनीने सहयोग केला आणि आशिया खंडातील या कंपनीचे सर्टिफिकेट मिळवणारी पहिली कंपनी म्हणून मानही मिळवला.
मामाअर्थ कंपनीने ग्राहकांना सुरुवातीच्या काळात शिक्षित केले. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या महिलांनी कंपनीची प्रसिद्धी करण्याचे काम केले. मामाअर्थ कंपनीचे प्रोडक्ट प्रीमियम प्रकारातील होते. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून कंपनीने विक्री चालू ठेवली. सध्या कंपनीचे २०० प्रोडक्ट बाजारात आहेत. मामाअर्थ कंपनीचे उत्पादने सौंदर्यप्रसाधने आणि बेबीकेअर म्हणून वापरली जातात. कंपनीच्या उत्पादनांची खरेदी सर्वसामान्यांपासून सर्वच वर्गातील लोक करतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने या कंपनीत गुंतवणूक केली आहे. वरून आणि गजल यांनी जिद्दीने हा उद्योग वाढवून जगभरात त्याचा विस्तार केला आहे.