लिंकडिन या नोकरी देणाऱ्या प्लॅटफॉर्मनेही कर्मचाऱ्यांची केली कपात
लिंकडीन कंपनीने भारतातील ऑफिसमधील कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
लिंकडिन या नोकरी पुरवणाऱ्या प्लॅटफॉर्मबद्दल तुम्हाला माहिती असेल. या नोकरी देणाऱ्या कंपनीनेच कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. जगभरात आर्थिक मंदी वाढत आहे. त्यामुळे परिस्थितीचा सामना करण्यासाठी लिंकडिन कंपनीने ही टाळेबंदी केली आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीची मालकी असणारा लिंकडिन हा व्यावसायिक नेटवर्किंग आणि भरती प्लॅटफॉर्म आहे. त्यांनी किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले हे अद्याप अधिकृतपणे समजलेले नाही.
या कंपनीमध्ये नोकर कपात करण्याची योजना मायक्रोसॉफ्ट कंपनीची होती. लिंकेडिन कंपनीच्या वेगवेगळ्या विभागातून कमीत कमी १०,००० नोकऱ्यांमध्ये कपात करण्यात आल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अलीकडेच ब्लूमबर्गने मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या नोकरकपातीबाबत माहिती दिली होती. १३ फेब्रुवारीला लिंकडिनच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले होते. हार्डवेअर विभागातील हॉलोलेन्स, सरफेस आणि एक्सबॉक्स विभागातील कर्मचाऱ्यांना पुनर्रचनेचा भाग म्हणून काढण्यात आले आहे.
याबद्दलची माहिती मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये कर्मचारी राहिलेल्या निकोले झवाकी यांनाही कर्मचारी कपातीचा फटका बसला आहे. झवाकी यांनी लिंकडिन मार्फतच नवीन नोकरी शोधायला सुरुवात केली आहे. लिंकडिनाच्या या कर्मचारी कपातीचा फटका भारतातील कंपनी विभागालाही बसला आहे.
लिंकडिन हे जगातील सर्वात मोठे व्यावसायिक नेटवर्क असणारा प्लॅटफॉर्म आहे. लिंकडिनच्या माध्यमातून नोकरी किंवा इंटर्नशिप शोधणे, व्यावसायिक नेटवर्किंग करणे आणि नवीन कौशल्य शिकायला मिळतात. त्यामाध्यमातून करिअर मध्ये वाढ होत जाते.
लिंकडिन प्रोफाईलच्या मदतीने तुम्ही तुमच्याबद्दलची माहिती जगाला सांगू शकता. तुम्ही अनुभव, कौशल्य आणि शिक्षणाची माहिती प्रोफाइल मध्ये अपडेट करू शकता. लिंकडिनच्या माध्यमातून ऑफलाईन कार्यक्रमांना हजर राहणे, नवीन ग्रुप जोडणे, आर्टिकल लिहिणे, फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले जातात. या प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्हीही फायदा करून घेऊ शकता.