गुगल इंजिनिअरने केले गीता जीपीटी तयार; भागवत गीतेने प्रेरित झालेला एआय चॅटबॉट देईल प्रश्नांची उत्तरे.
चॅट जीपीटीची सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. त्याच धर्तीवर आलेल्या गीता जीपीटीबद्दलची माहिती समजून घ्यायला हवी.
पहिल्यांदा चॅटजीपीटी आले आणि इंटरनेट जगतात त्याने धुमाकूळच घातला. त्यामुळे इंटरनेटवर नवीन क्रांती आली. यानंतर अनेक स्टार्टअपने एआय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. एआयवर आधारित गुगलने त्यांचे ‘बार्ड’ आणि मायक्रोसॉफ्टने ‘बिंग’ नावाच्या स्टार्टअपची घोषणा केली.
आता गुगलच्या एका इंजिनिअरने एआय वर आधारित चॅटबॉट आणले असून त्याचे नाव ‘गीता जीपीटी’ आहे. इंजिनिअरने ट्विटरवर लिहिलेल्या माहितीनुसार या ॲपद्वारे एआयच्या माध्यमातून आधुनिक जगाला भगवद गीतेचे ज्ञान दिले जाणार आहे.
सुकुरू साई विनीत याने गीता जीपीटीची निर्मिती केली आहे. गुगल मध्ये साई सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर पदावर कार्यरत आहे. त्याने तयार केलेल्या ॲपद्वारे वापरकर्त्ये प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर गीतेवर आधारित असणाऱ्या एआयद्वारे उत्तरे दिली जातील. गीता जीपीटी मुळे जीवनातील निर्णयांमध्ये सहज संवादात्मक मार्गाने अंतर्दुष्टी आणि स्पष्टता मिळत जाईल.
या प्लॅटफॉर्मद्वारे वापरकर्त्यांना गीतेच्या माध्यमातून दररोजच्या जीवनातील समस्यांची उत्तरे मिळून जातील. वापरकर्त्याने प्रश्न विचारल्यावर एआयच्या मदतीने भगवद गीतेच्या आधाराने प्रश्नांची उत्तरे मिळतात.
विनितने हे चॅटबॉट कसे काम करते याबद्दलची माहिती दिली आहे. ओपन एआय उत्तरे देण्यासाठी प्रसिद्ध आहे. हि एआय प्रणाली इंटरनेटवरील मजकुरावर प्रक्रिया करून विश्लेषण करून प्रतिसाद देते, यावरच आधारित काम चॅट जीपीटीने सुरु केले होते.