फ्लिपकार्टने केली नवीन योजना जाहीर; शेतकरी आणि एफपीओला पाठींबा देण्यासाठी केली समर्थ कृषी प्रोग्रामची सुरुवात

फ्लिपकार्टने नवीन जाहीर केलेल्या समर्थ कृषी प्रोग्राममध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे. 'सह्याद्री कृषी फार्म' या शेतकरी उत्पादक कंपनीला फ्लिपकार्टने ऑनबोर्ड केले आहे.

0

फ्लिपकार्ट हे फ्लिपकार्ट ‘समर्थ कृषी’ हा प्रोग्राम देशात आणणार आहे. यामध्ये शेतकरी समूह आणि शेतकरी उत्पादक कंपनीला समाविष्ट केले जाणार आहे. या माध्यमातून देशातील मार्केटचे दरवाजे उघडले जाणार असून त्या माध्यमातून वाटाघाटीच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जातील. 

कंपनीच्या माहितीनुसार, फ्लिपकार्ट समर्थ कृषी हा प्रोग्राम शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांची क्षमता वाढवण्याचे काम करणार आहे. यामाध्यमातून शाश्वतपाने पिकांची वाढ करून मार्केट उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर आर्थिक बाजाराचे दरवाजे खोलून पार्टनरशिपही केली जाणार आहे. 

या प्रोग्रामचा भाग म्हणून शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रशिक्षण आणि टेकनॉलॉजीचे कौशल्ये शिकवले जाणार आहे. त्यामुळे चांगले उत्पादन घेण्याचा सराव होण्यास मदत होईल असे कंपनीचे म्हणणे आहे. 

फ्लिपकार्टने सध्याच्या घडीला अनेक कंपन्या आणि सरकारी विभागामध्ये भागीदारी केलेली आहे. शेती क्षेत्रात आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांसोबत भागीदारी केलेली आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना फ्लिपकार्ट त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ऑनबोर्डिंग करणार आहे. 

या सहयोगातून ईकॉमर्स दिग्गज कडधान्य, बाजरी आणि संपूर्ण मसाले थेट शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे स्थानिक कृषी अर्थव्यवस्थेला आणि भारतातील हजारो शेतकऱ्यांच्या जीवनमानाला चालना मिळणार आहे. 

कंपनीने काही शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्लॅटफॉर्मवरती आणायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये एबीवाय फार्मर्स, श्री सत्य साई मॅक फेड, जन जीवन, निराला हर्बल, सह्याद्री फार्म्स सप्लाय चेन आणि इतर कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये १०,००० शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. उत्पादनाची सुरक्षितता आणि अन्न सुरक्षा अंतर्भूत करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.