शार्क टॅंक इंडिया – अपयशाला घाबरू नका, त्यातून शिकत राहा; बोटचे संस्थापक अमन गुप्ता यांची गोष्ट
बोट कंपनीचे सहसंस्थापक अमन गुप्ता यांनी बोट नावाचा इअरफोनमधील मोठा ब्रँड आहे. अमन हे पेशाने सीए असून शून्यातून त्यांनी बोट ब्रँड उभा केला आहे.
बोटचे संस्थापक अमन गुप्ता हे पेशाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. भारतातील सर्वात युवा सीए म्हणून त्यांना ओळखले जाते. बोट ब्रँडचे वायरलेस स्टेरिओ मार्केटमध्ये ३५.८% हक्क आहेत. कंपनीने २०२१ मध्ये १५०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्यातून बोटला ७८.६ कोटी रुपयांचा नफा झाला. बोट कंपनीने यामधून १४ कोटी रुपयांचा कर्मचाऱ्यांना पगार दिला.
वन प्लस कंपनीप्रमाणे बोट ब्रॅंडने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. बोटचे इअरफोन येण्याच्या आधी काही घटना घडल्या होत्या. त्यामुळे बोट ब्रँड वाढायला मार्केटची मदत झाली. २०१६ मध्ये अँपल कंपनीचे वायरलेस एअरपॉड्स आले होते. त्यानंतर २०१६ सालीच जिओ कंपनी बाजारात आली. फोन कंपन्यांनी मोबाइलसोबत इअरफोन देणे बंद केले.
बोट कंपनीने २०१७ – १८ मध्ये १ हजार ते ५ हजारच्या दरम्यान इअरफोन बाजारात आणले. त्यावेळी हार्दिक पांड्याने बोट ब्रँडची जाहिरात केली. जेबीएल फ्लिपची किंमत ४९९९ रुपये होती तर बोट कंपनीच्या ब्ल्यूटुथ स्पिकरची किंमत २१९९ रुपये होती. कंपनीचे सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थी ग्राहक होते. विद्यार्थ्यांना २८९ रुपये हेडफोन मिळत होते तर पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेच विद्यार्थी बोट कंपनीचे महागडे प्रोडक्ट विकत घेत.
अमन गुप्ताने गर्दीच्या बाजारात स्वतःचे प्रोडक्ट वेगळे कसे ठेवता येईल याचा अभ्यास केला. १००० ते ५००० रुपयांच्या गर्दीत बोटचे इअरफोन आल्यानंतर त्यांनी बाजारात बोट ब्रँडचे स्थान निर्माण केले. बोटने श्रेयस अय्यर, कार्तिकार्यन आणि किआरा अडवाणी यांना कंपनीसोबत करारबद्ध केले.
अमन गुप्ता पुढे सांगतात की, “विक्री करताना इगो नसायला हवा, आपण आपल्या उत्पादनाची विक्री कशी करू शकतो याकडे लक्ष द्यायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणतीही गोष्ट करताना त्यामध्ये आवड असायला हवी, म्हणजे ते करताना सगळे सोपे वाटते.
प्रयत्न नाही केले तर नंतर दोषी वाटत राहते . त्यामुळे योग्य वेळेला योग्य प्रोडक्ट्ची विक्री केली जाते. ग्राहक ओळखून त्यांची काळजी घेतली तर कंपनीची वाढ होत राहते. सर्वात महत्वाचे म्हणजे अपयशाला न घाबरता नवीन नवीन शिकत राहायला हवे.”