दुबईच्या श्रीमंतीमागील गोष्टी
दुबई देश श्रीमंत आहे हे आपणा सर्वांनाच माहित आहे. पण हा देश एवढा श्रीमंत कसा झाला आणि त्यामागे कोणती कारणे होती हेही माहित असायला हवे.
जेव्हा कधी जगात श्रीमंत देशांची चर्चा सुरु होते तेव्हा सर्वात पुढे दुबईचे नाव येते. त्या देशामध्ये असे काय आहे की तो देश श्रीमंत झाला हे जाणून घेऊयात. १९६६ साली नैसर्गिक तेलाचा दुबईत शोध लागला तेव्हा दुबईचे शेख राशिद यांनी म्हटले होते, आमच्याकडे चांगल्या आणि वाईट दोन्ही बातम्या आहेत. आम्हाला तेल सापडले पण ते पुरेसे नाही.
जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत दुबई देश १२ व्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी सात राज्यांचे अरब साम्राज्य उभे राहिले. त्यामध्ये दुबई, अबू धाबी, शारजाह, फुजैराह, अजमान, उमअल कैवान आणि रसेल खैमाह या राज्यांचा समावेश होतो. युनायटेड अरब एमिरेट्स हे जागतिक उद्योग केंद्र आणि पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले.
या ठिकाणीच जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज ऑफ खलिफा असून पोलिसांच्या ताफ्यात चक्क सुपरकार्स आहेत. जगातील सर्वात व्यस्त म्हणून ओळखले जाणारे जेबेर अली बंदर आणि दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट याच ठिकाणी आहे. दुबई देशात उद्योगासाठी टॅक्स ब्रेक्स, कस्टम ड्युटी बेनिफिट आणि नो फॉरेन रेस्ट्रिक्शन सुविधा दिल्या जातात.
जेबेल अली फ्री झोन म्हणजेच जेफजा भागात २० टक्क्यांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक करण्यात आली आहे. येथे १५०० पेक्षा जास्त लोक काम करतात. या ठिकाणी ८० बिलियन डॉलर पेक्षा जास्त व्यापार होतो. दुबईच्या जीडीपीमध्ये या व्यापाराचे योगदान २१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. जगातील ६ नंबरचा हा स्थलांतरितांचा देश असून जवळपास ८० टक्यांपेक्षा जास्त दक्षिण आशियाई येथे काम करतात.
२०१७ युएईच्या फेडरल नॅशनल काउन्सिलने केलेल्या कायद्यानुसार येथील प्रत्येक कामगाराला वर्षातून ३० आणि आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळते. या ठिकाणी असणारे काम कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाचे असून प्रत्येक कामगाराचा मेडिकल इन्शुरन्स संबंधित कंपनीकडून काढला जातो. जगातील सर्वात श्रीमंत शहर अबुधाबी असून ९ टक्के तेलाचा साठा याच शहरात सापडतो. दुबई देशाची अर्थव्यवस्था ट्रेड, पर्यटन आणि फायनान्स क्षेत्राशी संबंधित आहे.
आपणही कधी जमले तर दुबई देशात जाऊन फिरून या, काही नाही तर येताना नवीन स्वप्ने नक्की घेऊन याल.