२० व्या वर्षी विधवा झाल्यावर मुलांचे संगोपन करण्यासाठी चालू केली सेंद्रिय शेती; आज करतात ५०० शेतकऱ्यांसोबत व्यावसायिक शेती

कोंडा उषारानी यांनी आंध्र प्रदेश राज्यात सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. आज त्यांचा 'वासवी दुर्गा सेंद्रिय उत्पादने' नावाचा ब्रँड असून १६ गावातील शेतकऱ्यांना सेवा पुरवतात.

0

आंध्र प्रदेश येथील गुंटूर जिल्ह्यातील नटक्की गावात शेतकरी कुटुंबात कोंडा उषारानी यांचा जन्म झाला. घरच्या गरिबीमुळे त्यांना दहावी नंतरचे शिक्षण थांबवावे लागले. बाकी मुलींसारखेच त्यांचेही वयाच्या १७ व्या वर्षीच लग्न लावून देण्यात आले. लग्न होऊन तीन वर्ष झाल्यानंतर दोन मुलांचा जन्म झाला. त्यानंतर एका अपघातात त्यांच्या नवऱ्याचे निधन झाले. 

पतीचे निधन झाल्यानंतर रात्रीत घरची सगळी जबाबदारी उषारानी यांच्या डोक्यावर येऊन पडली. सुरुवातीला काम केल्यानंतर कुटुंबाच्या एक एकर शेतीवर त्यांनी शेतीला सुरुवात केली. २०१३ मध्ये हळदीची लागवड केली. सुरुवातीला शेतीचे ज्ञान नसल्यामुळे उषारानी यांनी रसायनांचा वापर केला पण नंतर त्यांना त्याचे दुष्परिणाम दिसून आले. 

दररोज रासायनिक कीटकनाशकांच्या संपर्कात आल्यामुळे शेतकऱ्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते.  त्यांनी सुरुवातीला सेंद्रिय शेतीचे क्लास करून अधिकची शेती करायला सुरुवात केली. पाच एकरात भात शेती आणि एक एकरात हळदीच्या शेतीला सुरुवात केली. शेतीच्या बांधावर उषारानी यासिन पेरूची झाडे लावली. सुभाष पालेकर या कृषी कर्मचाऱ्याने उषारानी यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी मार्गदर्शन केले. 

सेंद्रिय शेती करताना त्यांनी खते आणि कीटकनाशके स्वतःच बनवण्याचा निर्णय घेतला. गावात उभ्या केलेल्या दुकानातून उत्पादनांची विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्या खतांमध्ये प्राण्यांचे मलमूत्र, गोमूत्र, कडुनिंब, जैव कंपोस्ट आणि इतर नैसर्गिक वस्तू मधून बनवण्याचा प्रयत्न केला. उषारानी शेतकऱ्यांना शेततळे उभारण्यासाठीही मदत करतात. 

त्यांनी ५०० शेतकऱ्यांसोबत काम करून त्यांना सल्ला दिला जातो. त्या शेतकऱ्यांना सेंद्रिय उत्पादनांची विक्री केली जाते. शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यास उषारानी संबंधित शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचा हिस्साही स्वीकारतात. त्यांनी ऑनलाईन बाजारातही पाऊल ठेवले. वर्ष २०२० मध्ये दोन विद्यार्थ्यांच्या मदतीने ‘वासवी दुर्गा सेंद्रिय उत्पादने’ या ऑनलाईन स्टोअरची सुरुवात केली आहे. 

उषारानी त्यांची उत्पादने वेबसाईटच्या माध्यमातून गुंटूर जिल्ह्यातील १६ गावांमध्ये विक्री करते. सगळ्यांना यामुळे सारखेच उत्पन्न मिळण्यास मदत मिळते. ग्राहक थेट शेतकऱ्यांकडून सामानाची खरेदी करू शकतात. उषारानी यांना संपूर्ण देशात सेंद्रिय शेती करायची असल्याचे सांगितले आहे. उषारानी यांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातही महिला उद्योजिका उभ्या राहिल्या तर नवल वाटायला नको.

Leave A Reply

Your email address will not be published.