अॅपल ब्रँडच्या यशामागची गोष्ट.
अॅपल कंपनीच्या आयफोनची जगभरात मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. कंपनीच्या आयफोन ६ या मॉडेलची २,२२ मिलियन युनिटची विक्री करण्यात आली होती.
अॅपल आयफोन 14 सीरिजचे 7 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात आले. यावेळी एअरपॉड प्रो आणि अॅपल वॉच सिरीज 8 चे लॉंचिंग करण्यात करण्यात आले. 4 प्रकारच्या आयफोनचे लॉंचिंग यावेळी कंपनीच्या वतीने करण्यात आले. यामध्ये आयफोन 14, आयफोन 14 मॅक्स / प्लस आयफोन 14 प्रो आणि आयफोन 14 प्रो मॅक्सचा समावेश होता.
अॅपल फोन जगभरात प्रसिद्ध का झाला किंवा त्यांनी मोठ्या प्रमाणावर फायदा कसा मिळवला यामागे त्यांची विशिष्ट अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. 19 ऑगस्ट 2020 रोजी अॅपल कंपनीची उलाढाल तब्बल 2 ट्रिलियन डॉलर होती. यामागे कोणती कारणे होते हेच या लेखातून समजून घेणार आहोत.
2007 साली स्टीव्ह जॉब्स यांनी अॅपल आयफोनची घोषणा केली होती. अॅपल फोन टचस्क्रीन आणि अँपस्टोअर उपलब्ध असल्यामुळे त्याची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली. अॅपल सिरीजमधील आयफोन 6 लाँच झाल्यानंतर त्याची सर्वात जास्त विक्री झाली होती. त्या फोनच्या तब्बल 2,22 मिलिअन युनिट्सची विक्री झाली होती. 2015 पर्यंत अॅपल कमाई फक्त मोबाईल विक्रीवर अवलंबून होती.
त्यानंतर 2016 रोजी टीम कुक यांनी घोषणा केली की अॅपल कंपनी सॉफ्टवेअर क्षेत्रात उतरणार आहे. वर्ष 2021 मध्ये 1,91 बिलिअन डॉलर किंमतीच्या आयफोनची जगभरात विक्री झाले होती. आयफोन विक्रीतून 35 टक्के आणि सॉफ्टवेअर सर्व्हिसमधून 78 टक्के फायदा कंपनीला होत होता असे ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते.
अॅपल कंपनीने रेझर प्रोडक्ट पद्धतीतून विक्रीला सुरुवात केली. कमी किंमतीत वस्तू विकून छोट्या सर्व्हिसमधून कंपनीने चांगले पैसे कमावले. रेझरब्लेड कंपनी ही कमी किमतीत रेझर विकून ब्लेड आणि इतर साहित्यातून जास्त पैसे कमावते. .
त्यानंतर अॅपल कंपनीने म्युझिक अॅपचे महिन्याचा प्रीमियम 1,49 रुपये होता. अॅपल कंपनी दुसऱ्या कंपन्यांना महिन्याचे अॅपसाठी 29 रुपये भाडे आकारत होती. अॅपलने विक्री केलेल्या अॅपल वॉच मधील डेटा हा हेल्थ संदर्भातील कंपन्यांना विकला. अॅपल कंपनीने क्रेडिट कार्ड द्यायला सुरुवात केली. आगामी काळात अॅपल कंपनी ग्लास आणि कारच्या प्रकल्पावर काम करत आहे. कंपनीने m१ नावाचे सॉफ्टवेअर लाँच केले असून त्यामुळे मॅकबुकच्या विक्रीत चांगली वाढ झाली आहे.