2023 मध्ये 1 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या
2023 वर्षात कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या नोकरीमध्ये मोठ्या प्रमाणावर कपातीला सुरुवात केली आहे. नोकरी देणाऱ्या लिंकेडिन या कंपनीनेही त्यांच्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याची प्रक्रिया एवढ्या गतीने सुरु आहे की, नवा विक्रम निर्माण होईल, असे वाटते. केवळ फेब्रुवारी महिन्यातच 17 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कंपन्यांनी काढून टाकले. त्याच वेळी, जानेवारीमध्ये सुमारे 1 लाख लोकांची नोकरी गेली आहे.
2023 मध्ये आतापर्यंत जगभरातील सुमारे 340 कंपन्यांनी 1.10 लाखांहून अधिक कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले आहे. याचा मोठा परिणाम तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर झाला आहे. टेक उद्योगातील 17,400 हून अधिक कर्मचार्यांनी फेब्रुवारी महिन्यात जागतिक स्तरावर नोकऱ्या गमावल्या. यात भारतीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
जगभरातील 288 पेक्षा जास्त कंपन्यांनी दररोज सरासरी 3,300 पेक्षा जास्त तंत्रज्ञान कामगारांना कामावरून काढून टाकले. मंदीच्या भीतीने येत्या काही दिवसांत नोकऱ्यांमध्ये आणखी कपात होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 11,000 कर्मचार्यांना काढून टाकल्यानंतर, मेटा (पूर्वीचे Facebook) पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्याची योजना आखत असल्याच म्हटल जात आहे.Yahoo, BYJU’s, GoDaddy, GitHub, eBay, Autodesk, OLX Group आणि इतर काही कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे.
चिनी ॲप टिकटॉकने भारतातील सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. Disney कंपनीन देखील कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 7 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय कंपनीन घेतला आहे.
एव्हिएशन प्रमुख बोईंग यावर्षी वित्त आणि एचआर वर्टिकलमध्ये 2,000 नोकऱ्या कमी करत आहे आणि कंपनीने यापैकी एक तृतीयांश नोकऱ्या बेंगळुरूमधील टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस (TCS) ला आउटसोर्स केल्या आहेत. 2022 मध्ये, 1,000 हून अधिक कंपन्यांनी 154,336 कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले.
गुगलने देखील मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. गुगलने जवळपास 12 हजार लोकांना कामावरून काढून टाकले होते. गुगल व्यतिरिक्त मेटा (फेसबुक आणि इंस्टाग्राम), अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, एसएपी, ओएलएक्स आणि इतर काही मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.