युट्युबच्या सीईओचा राजीनामा: भारतीय वंशाचे नील मोहन नवे सीईओ!
युट्युबचे सीईओ सुसान वोजीकी यांची जागा भारतीय वंशाचे अमेरिकन निल मोहन घेणार आहेत. सध्या युट्युबमध्ये ते चीफ प्रोडक्ट ऑफिसर पदावर कार्यरत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून इंटरनेटवर व्हिडिओ दाखवणाऱ्या यूट्यूबच्या सीईओ सुसान वोजिकी यांनी आपल्या भूमिकेतून पायउतार होत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने सांगितले की, यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान वोजिकी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची जागा आता भारतीय वंशाचा अमेरिकन नील मोहन घेणार आहे.
भारतीय वंशाचे नील मोहन आता यूट्यूब (YouTube) चे नवे सीईओ असतील. ते सुसान व्होजिकी यांची जागा घेतील. मागील ९ वर्षापासून जगातील सर्वात मोठी व्हिडिओ वेबसाईट Youtube चे नेतृत्व करणाऱ्या सुसान व्होजिकी आपल्या पदावरून पायउतार होत आहेत. त्यांची जागा त्यांचा जूनिअर राहिलेले नील मोहन घेणार आहेत.
गूगल आणि यूट्यूबची पालक कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुद्धा भारतीय वंशाचे सुंदर पिचाई आहेत. यूट्यूब जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. नील मोहन सीईओबरोबरच यूट्यूबचे सीनियर व्हाइस-प्रेसिडेंटच्या भूमिकेतही असतील.
नील यांच्यापूर्वी सिलिकॉन व्हॅलीत अनेक भारतीयांनी झेंडा रोवला आहे. त्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, एडोबचे सीईओ शांतनु नारायण आणि आईबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा सामील आहे. त्याचबरोबर जगातील मोठ्या टेक कंपन्या सध्या भारतीय वंशाचे लोक चालवत आहेत.
यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंक ने गुरुवारी १६ फेब्रुवारी रोजी याची घोषणा केली. YouTube च्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात सुसान व्होजिकी यांनी म्हटले आहे की, आपले कुटूंब, आरोग्य व काही वैयक्तिक प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी यूट्यूब कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
नील मोहन सध्या यूट्यूबचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर आहेत. नोव्हेंबर २०१५ मध्ये त्यांनी यूट्यूब ज्वाईन केले होते. नील मोहन यांच्या लिंक्डन प्रोफाइलनुसार त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून एमबीए केले आहे. त्यांनी करिअरची सुरुवात एक्सेंचर कंपनीसोबत केली होती.