मायक्रोसॉफ्टचा झाला वाढदिवस; ४८वर्षांची झाली कंपनी.
मायक्रोसॉफ्ट कंपनी सर्वानाच माहित आहे. कॉम्प्युटर वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काम करताना याचा वापर करावा लागतो. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स आहेत.
मायक्रोसॉफ्टची सुरुवात
५ एप्रिल १९७५ला बिल गेट्स आणि पॉल एलन यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. जग बदलणाऱ्या गोष्टींमध्ये किंवा नवीन जग वसवणाऱ्यांमध्ये मायक्रोसॉफ्टचे नाव नक्कीच वरच्या क्रमांकावर असेल.
मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन ही रेडमंड, वॉशिंग्टन, युनायटेड स्टेट्स येथे मुख्यालय असलेली एक बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे. मायक्रोसॉफ्टने आधुनिक जगाला आकार देताना सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान उद्योगातील भरीव योगदान ह्याद्वारे महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
कंपनीच्या सेवा
मायक्रोसॉफ्टच्या काही सुप्रसिद्ध उत्पादनांमध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टम, मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूट, एक्सबॉक्स गेमिंग कन्सोल आणि वैयक्तिक संगणक आणि टॅब्लेटची सरफेस लाइन समाविष्ट आहे. मायक्रोसॉफ्ट त्याच्या Azure प्लॅटफॉर्मद्वारे क्लाउड सेवा देखील पुरवते.
विंडोजमुळे सर्वसामान्य माणसांना संगणक हाताळणे अगदी सुटसुटीत करून दिले. तर ऑफिस ह्या सॉफ्टवेअरमुळे कार्यालयीन कामे सोपी बनली आहेत. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधल्या वर्ड एक्सेल पावरपॉईंट ह्या गोष्टी आता दैंनदिन जोवनच्या अविभाज्य भाग बनल्या आहेत. गुगल क्रोम मोठ होण्यापूर्वी इंटरनेट ब्राउझिंगसाठी इंटरनेट एक्सप्लोरर हे एकमेव ब्राउझर लोकप्रिय होते. अनेकजण इंटरनेट वापरायला ह्याच ब्राउझरवर शिकले.
बदलते मायक्रोसॉफ्ट
पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेलं मायक्रोसॉफ्ट आता जरा बदलत्या काळाशी जुळवून घेत आहे. अलिकडच्या वर्षांत, मायक्रोसॉफ्टने क्लाउड कॉम्प्युटिंग आणि (AI) कृत्रिम बुद्धिमत्तेकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे आणि या क्षेत्रांमध्ये भली मोठी गुंतवणूक केली आहे. मायक्रोसॉफ्ट ही कंपनी फिलान्थ्रॉपीज डिव्हिजनद्वारे शिक्षण, जागतिक भूक आणि पर्यावरणीय मुद्द्याशी संबंधित उपक्रमांवर काम करते.
एकूणच, तंत्रज्ञानात मायक्रोसॉफ्टचे योगदान आणि आधुनिक जगावर त्याचा प्रभाव लक्षणीय आणि दूरगामी आहे.
हॅप्पी बड्डे मायक्रोसॉफ्ट !!!
-शंतनू खानवेलकर