शार्क टॅंक इंडिया : उद्योजकतेत लांब पल्याचा खेळ खेळायचा असेल तर स्थिर आणि दृढ राहायला हवे – अनुपम मित्तल

शार्क टॅंक इंडियामध्ये सर्वात यशस्वी शार्क्स म्हणून अनुपम मित्तल यांची ओळख आहे. शादी डॉट कॉमची अनुपम यांनी सुरुवात केली होती.

0

शादी डॉट कॉम आणि पीपल्स ग्रुपचे अनुपम मित्तल शार्क टॅंक इंडियाच्या दुसऱ्या भागात सहभागी झाले आहेत. त्यांनी पहिल्या सिझनमध्ये २४ स्टार्टअप मध्ये गुंतवणूक केली होती. अनुपम मित्तल यांनी त्यांच्या उद्योजकीय प्रवासातून शिकवलेले धडे सांगितलेले आहेत. ते म्हणतात की, “नियम तोडायच्या आधी तो समजून घेणे गरजेचे आहे. स्वतःवर विश्वास ठेवून कामाला सुरुवात केली की यश मिळत जाते.” 

मित्तल यांनी शादी डॉट कॉमची सुरुवात केली होती तेव्हा त्यांना कंपनीसाठी कर्मचारी मिळत नव्हते. भारतातील पहिली मोबाईल गेम कंपनी ‘मौज’ मोबाईल इंडियाची स्थापना मित्तल यांनी केली. त्यांनी शादी डॉट कॉम नंतर मकान डॉट कॉमचीही सुरुवात केली होती. मित्तल यांनी पुढे म्हटले आहे की, मी जे केले ते चांगल्या भावनेने केले. त्यांनी २०० पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये कोणता फरक असतो याची माहिती देताना मित्तल सांगतात की, “जी लोक टिकून राहतात तीच दीर्घकाळ यशस्वी होतात.” 

मोठा व्यवसाय किंवा मार्केटमध्ये नाव करायला कमीत कमी १५ ते २० वर्ष लागतात. उद्योजकाला एखादे ध्येय असले की त्याचा प्रवास लांब होतो. माणसांना जोडणे हेच माझे ध्येय असल्याचे अनुपम मित्तल आवर्जून सांगतात. आयुष्य हा खेळ असून त्यामधल्या खेळाचा आनंद घ्यावा अशीही सूचना त्यांनी केली आहे.

ओला कंपनीचे संस्थापक भाविश अग्रवाल यांच्या कंपनीत मित्तल यांनी गुंतवणूक केलेली आहे. उद्योजकता ही गतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत असल्यामुळे अनेक संधीमध्ये वाढ होत आहे. अनुपम मित्तल यांच्याकडून चिकाटी आणि मोठे ध्येय असावे हे गुण शिकण्यासारखे आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.